युवांचे कार्यक्रम

विविध उपक्रम :-

पुर्ण वाचा

विवेक लघुपट स्पर्धा :-

महाराष्ट्र अनिस आणि आटपाट निर्मिती ह्यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती विवेक लघुपट स्पर्धेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. ह्या मधील निवडक पन्नास लघुपटांचा विवेक लघुपट महोस्तव १७ आणि १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय प्रभात रोड पुणे येथे होणार आहे अशी माहिती आटपाट निर्मितीच्या गार्गी कुलकर्णी आणि महाराष्ट्र अनिसचे सांस्कृतिक विभाग कार्यवाह योगेश कुदळे ह्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली ह्यावेळी अनिसचे मिलिंद देशमुख, हमीद दाभोलकर, नंदिनी जाधव व श्रीपाल ललवाणी उपस्थित होते.

पत्रकार परिषदे मध्ये पुढे  गार्गी कुलकर्णी ह्यांनी असे  सांगितले कि फ्याड्री आणि सैराट ह्या दोन्ही सिनेमा मधून आटपाट निर्मितीने सामाजिक प्रश्नांना मध्यभागी ठेवून सिनेमाची निर्मिती केली आहे त्याच भावनेने डॉ नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयावरती विवेक  लघुपट स्पर्धेची योजना करण्यात आली होती.ह्या स्पर्धेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अडीचशे पेक्षा अधिक लघुपट स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

संकल्प :-

पुर्ण वाचा

संविधान जागर यात्रा – प्रेस नोट :-

यावर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती महोत्सवानिमित्त  भारतीय संविधानाचा विचार जनमानसात पोहचविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सर्व शाखानिहाय संविधान दिन (२६ नोव्हेंबर २०१६) ते प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी २०१७) या कालावधीत ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरविले आहे.

पुर्ण वाचा

संविधान जागर यात्रा – कार्यक्रमाविषयी :-

यावर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती महोत्सवानिमित्त  भारतीय संविधानाचा विचार जनमानसात पोहचविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सर्व शाखानिहाय संविधान दिन (२६ नोव्हेंबर २०१६) ते प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी २०१७) या कालावधीत ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरविले आहे.

पुर्ण वाचा

संविधान जागर यात्रा – संविधान बांधिलकी सूचना :-

पुर्ण वाचा

संविधान जागर यात्रा – रोख व्हाउचर :-

पुर्ण वाचा