विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव २०१७

शहिद डाॅ नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ‘आटपाट’ यांच्या संयुक्त प्रयत्नातुन विवेक राष्ट्रीय लघुपटाचे दि २८,२९ आॅक्टोंबर २०१७ रोजी आयोजन!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आटपाट निर्मिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव – 2017 आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये पुढील विषयावरलघुपट, माहितीपट व अॅनिमेशनपट बनविण्याकरिता आयोजित स्पर्धेच्या नियम व अटी पुढील प्रमाणे

स्पर्धेचा विषय : जाती प्रथा(Caste)

सहभाग श्रेणी:

 • खुला गट : सर्व वयोगटाकरिता खुला असेल.
 • विद्यार्थी गट :विद्यार्थी गटातसहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्रव शैक्षणिक संस्थेचे पत्र सादर करणे अनिवार्य आहे.
 • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता गट : अंनिस कार्यकर्त्यांना आपल्या संबंधित शाखेच्या कार्याध्यक्षांच्या स्वाक्षरीचे पत्र देणे आवश्यक आहे.

पारितोषिके:

 1. श्रीराम लागू सर्वोत्कृष्ट लघुपट (खुली श्रेणी)– रुपये 25,000/- व स्मृतिचिन्ह.
 2. निळूभाऊ फुले सर्वोत्कृष्ट लघुपट (विद्यार्थी श्रेणी) – रुपये15,000/- व स्मृतिचिन्ह.
 3. सदाशिव अमरापूरकर सर्वोत्कृष्ट लघुपट (म.अं.नि.स.कार्यकर्ताश्रेणी) – रुपये 5,000/- व स्मृतिचिन्ह.
 4. राम नगरकर सर्वोत्कृष्टमाहितीपट (विद्यार्थी श्रेणी) – रुपये10,000/- व स्मृतिचिन्ह.
 5. सर्वोत्कृष्टअॅनिमेशनपट – रुपये10,000/- व स्मृतिचिन्ह.

निवड झालेल्या 30 कलाकृतींना प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.

नियम व अटी :

 1. स्पर्धकांनीसहभागासाठी येणाऱ्या लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशनपट यांची लांबी शीर्षकासह 10 मिनिटापेक्षा अधिक नसावी.
 2. लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशनपट याकरिता कोणत्याही भाषेचे बंधन नाही, तरी इंग्रजी उपशीर्षके असणे गरजेचे आहे.
 3. स्पर्धकांनी आपली कलाकृती ही डि.व्ही.डी.च्यादोन प्रतिमध्ये पाठवणे बंधनकारक आहे.
 4. दोन्हीडि.व्ही.डी.वर लघुपटाचे नाव, सहभाग श्रेणी, लघुपटाचा कालावधी, दिग्दर्शकांचे नाव असणे आवश्यक आहे.
 5. डि.व्ही.डी. सोबत लघुपटाचे पोस्टर, फोटो, कलाकृतीचा सारांश, दिग्दर्शकांची माहिती जोडावी.
 6. कलाकृतीच्याडि.व्ही.डी. सोबत सहभागअर्जव ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 7. प्रत्येक स्वतंत्र कलाकृतीकरिता स्वतंत्र सहभाग अर्ज व सहभाग शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.
 8. कलाकृती निवडीचा अथवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार हा विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव निवड समितीचा असेल.त्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नसेल.
 9. सहभागासाठीआपल्याकलाकृतीच्या 2डि.व्ही.डी., सहभाग अर्ज,सहभाग शुल्काचे चेक/डीडीतसेचसर्व आवश्यक कागदपत्रे व साहित्यासह दि. 25 सप्टेंबर 2017 पासून 30सप्टेंबर 2017पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुढील पत्त्यावर जमा करावे:

पत्ता: साधना मिडिया सेंटर, अहिल्यादेवी हायस्कूल जवळ, शनिवार पेठ, पुणे411030.

 1. विहित कालावधी नंतर येणाऱ्या कलाकृतींचा स्पर्धेकरिता विचार केला जाणार नाही.
 2. स्पर्धेबाबत सर्वाधिकार हे अंनिस राज्य पदाधिकारी व आटपाटपदाधिकारी यांना असतील.

सहभाग शुल्क :

 • लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशनपट सहभागाकरितारु.500/- मात्र सहभाग शुल्क असेल.
 • सहभाग शुल्क 2डि.व्ही.डी., सहभाग अर्ज यांच्यासोबत देणे बंधनकारक आहे.
 • सहभाग शुल्क हे रोख/ चेक/डीमांड ड्राफ्टस्वरूपात जमा करू शकता.
 • चेक किंवा डीमांड ड्राफ्टअंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र या नावाने असावा.
 • कोणत्याही कारणास्तव सहभाग शुल्क व सोबत जोडलेले साहित्य(डि.व्ही.डी., सहभाग अर्ज,पोस्टर, फोटो आदी ) परत केले जाणार नाही.

अधिक माहिती करिता पुढील क्रमांकावर संपर्क साधावा

 • नंदिनी जाधव –९४०३४४८८६२
 • केशव कुदळे – ९८८१६९१६५१
 • कुणाल शिरसाठे – ९७६७५९९९३४

महत्वाचे संदर्भ-

१.  जात विषयाचे  विविध पैलू – Download

२. विवेक फिल्म फेस्टिवल २०१७ माहिती- Download

3. विवेक फिल्म फेस्टिवल २०१७ सहभाग अर्ज- Download

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *